कबड्डी, कबड्डी, कबड्डी ....
कबड्डी .... हा मराठमोळ्या महाराष्ट्राचा लोकप्रिय खेळ! जनमान्यतेबरोबरच राजमान्यता लाभलेल्या या कबड्डी खेळाने देशाचीच नव्हे, तर आशिया खंडाची वेश ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. हा खेळ एकाच सूरात (दमात) व एकाच नियमाने सर्वत्र खेळला जावा याकरिता भारतीय हौशी संघटनेची स्थापना होऊन आज जवळ जवळ सहा तपे होत आली. हे सर्व करण्यात व कबड्डीचा प्रचार व प्रसार करण्यास महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीच नाकारु शकणार नाही.

कबड्डी व्यवस्थापन प्रणाली - ऑनलाईन प्रोग्राम